मृतदेह अदलाबदल प्रकरण, सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदलीचा संतापजनक प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांना चांगलाच भोवला आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही राज्य शासनाने जारी केले आहेत.

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातत्याने गैरकारभारामुळे चर्चेत येत आहे. रुग्णालयातील अर्भक प्रकरण आणि मृतदेह अदलाबदलीचे गंभीर प्रकार महिनाभरात तब्बल दोन वेळा घडल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.