संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनीही संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी अनेक विषयांवर चर्चा केली.

या भेटीबाबत संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली, मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली! अनेक विषयांवर चर्चा झाली! राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे. या माणसाची खरंच कमाल आहे! असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शरद पवार पक्ष, संघटना बांधणी आणि जनतेची विचारपूस करण्यासाठी ते राज्यभर फिरणार आहेत. त्यांचा उत्साह वाखाखण्याजोगा आहे आणि कार्यरत राहण्याचा त्यांचा स्वभाव याचेही संजय राऊत यांनी कौतुक केले आहे.