
ब्लिंकिटने मुंबई विमानतळावरील टर्निटल-2 वर इन टर्मिनल डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहक आता या अॅपवरून चार्जर, बुकसह 2500 हून अधिक सामान ऑर्डर करू शकतील. ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी टर्मिनलच्या आतमध्ये होईल. यासाठी विमानतळाच्या आत खास वॉकर टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम लोकांना सामान पोहोचण्यास मदत करेल.
राजकुमार राव दादाच्या बायोपिकमध्ये
बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहे. गांगुलीचा बायोपिक दादा येत असून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती राजकुमार रावने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली. या बायोपिकची निर्मिती लव रंजन करत असून विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शन करत आहे.
वीर विक्रम यादव डीजीसीए महासंचालक
वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वीर विक्रम हे ओडिशा केडरचे 1996 च्या बॅचचे आयएएस आहेत. ते आता अहमद किडवई यांची जागा घेतील. किडवई यांची कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली झाली आहे.
मंगला कुप्पा बनल्या अमेरिकेत सीआयओ
हिंदुस्थानी वंशाच्या तंत्रज्ञान तज्ञ मंगला कुप्पा यांची अमेरिकेच्या श्रम विभाग म्हणजेच लेबर डिपार्टमेंटच्या चीफ इन्पर्ह्मेशन ऑफिसर (सीआयओ) पदी नियुक्ती करण्यात आली. मंगला या तात्पुरत्या स्वरूपात हे पद सांभाळत होत्या, परंतु अमेरिकन सरकारने आता त्यांच्याकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली.


























































