
दहा हजार रुपयाचे विदेशी चलन दरोडाप्रकरणी आणखी एकाला जुहू पोलिसांनी अटक केली. सागर वाघ असे त्याचे नाव असून तो महाराष्ट्र सुरक्षा बल जवान आहे. या पूर्वी तिघांना जुहू पोलिसांनी अटक केली होती. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत कामाला आहे. 25 मार्चला ते दहा हजाराचे विदेशी चलन घेऊन जात होते. जुहू येथे येताच एका कारमधून पाच जणांच्या टोळीने त्याचे अपहरण करून दहीसर येथे नेले. गाडीतील आरडाओरडा ऐकून दहीसर पोलिसांनी एकाला पकडून जुहू पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर जुहू पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत सागरचे नाव समोर आले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागरला अटक केली.



























































