पाकिस्तानात कॅबिनेट मंत्र्यांना सहा महिने नो सॅलरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका अनेक देशांसोबत पाकिस्तानलाही जबर बसला आहे. वाढती महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कठोर उपाययोजनांची घोषणा केली असून पुढील सहा महिन्यांपर्यंत कॅबिनेट मंत्र्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, सरकारने जनतेवरील भार कमी करण्यासाठी पेट्रोलवरील लेव्ही 80 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर देशभरातील पेट्रोल पंपांवर तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. शरीफ यांनी हेदेखील स्पष्ट केले की, पेट्रोलचे हे दर किमान पुढील एक महिना स्थिर राहतील.