क्यूबा दोन हजार कैद्यांना तुरुंगातून सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्यूबाने 2010 कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी क्यूबावर दबाव वाढवलेला असताना क्यूबाने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेला बऱयाच महिन्यांपासून क्यूबामध्ये कम्युनिस्ट सरकारमध्ये बदल हवा आहे. तसेच राजकारणातील कैद्यांची सुटका करण्याची मागणी अमेरिकेकडून वारंवार केली जात होती. क्यूबा सरकारने अद्याप हे स्पष्ट केले नाही की, कोणत्या कैद्यांना सोडले जाणार आहे, परंतु कैद्यांची निवड ही गुह्याची गंभीरता, कारागृहातील चांगला व्यवहार पाहून सरकार यासंबंधीचा निर्णय घेऊ शकते. हत्या, लैंगिक अत्याचार, ड्रग्ज, चोरी प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ केली जाणार नाही.