
हवामान बदलामुळे कोकणात आंबा व काजूच्या झाल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने देऊ केलेली सरासरी प्रति झाड 100 ते 200 रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही मदत कोकणातील शेतकऱयांची थट्टा करणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हेक्टरी किमान दोन लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्ष व कोकण जन विकास समितीने केली आहे. याबाबत जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कोकण संघटक सचिव संजय परब, जिल्हाध्यक्ष जगदीश नलावडे, कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, दिनेश राणे, प्रशांत गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे पत्र लिहिले आहे.


























































