
बऱ्याच वेळा चष्म्याची काच खराब होते. अयोग्य साफसफाई, खराब कापडाचा वापर किंवा खाली पडल्यामुळे काचेवर ओरखडे पडतात. चष्मा बॉक्समध्ये न ठेवता पुठेही ठेवल्यास ओरखडे किंवा फ्रेम वाकण्याची शक्यता असते.
साबण, डिटर्जंट किंवा हेअर स्प्रेचा थेट वापर केल्याने लेन्सवरचे कोटिंग खराब होते. त्यामुळे या गोष्टी करणे टाळावे. चष्मा नेहमी मऊ मायक्रोफायबर कापडानेच पुसावा. चष्मा वापरत नसताना नेहमी त्याच्या कडक बॉक्समध्ये ठेवा.


























































