Video – I Parth Ajit Pawar… पार्थ पवार यांनी इंग्रजीत घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. पार्थ पवार यांनी ही शपथ इंग्रजीत भाषेत घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना पाठविण्यात आले आहे.

पवार परिवाराच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे या देखील लोकसभेमध्ये खासदार आहेत. तसेच शरद पवार यांचा पुतण्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे देखील राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेमध्ये दिसणार आहेत.