
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर भरदिवसा माथेफिरू प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा चिरून तिचा निघृण खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करमाड येथील गणपती मंदिराजवळ इंडियन ऑईलचा एक पेट्रोल पंप आहे. पूजा सुदाम गावंडे ही तरुणी या पेट्रोल पंपावर काम करते. गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास तिचा प्रियकर सत्यम गावंडे हा तिथे दुचाकीवरून आला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सत्यमने रागाच्या भरात स्वत:कडील धारदार चाकून आधी पूजाच्या पाठीत वार केला त्यानंतर तिचा गळा चिरला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सत्यम तिथून पळून गेला.
पूजा व सत्यम यांच्यात प्रेमप्रकरणातील संशयावरून वाद झाला व त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनेच्या काही तासातच फरार सत्यमला अटक केली.


























































