
आसाममध्ये आज विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे जलुकबारी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मतदानाच्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना हिमांता सरमा हे लल्लनटॉप चॅनेलच्या पत्रकारावर भडकले.
या पत्रकाराने त्यांना असंसदीय भाषेवरून प्रश्न विचारला होता. तो प्रश्न ऐकताच सरमा हे चांगलेच संतापले व माझी भाषा लल्लनटॉपपेक्षा चांगली असते असे त्या पत्रकाराला सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर पत्रकारानेही त्यांच्या भाषेवरून त्यांना सुनावले त्यावेळी सरमा यांनी मी तुला बोलावले नाही मग तू मला का प्रश्न विचारत आहे, असा प्रश्न केला. तसेच तुमच्या चॅनेलबद्दल कधी ऐकले नाही, काय अर्थ आहे तुमच्या चॅनेलच्या नावाचा असाही प्रश्न त्या पत्रकाराला केला.
उल्टा चोर कोतवाल को डाँटे!
भाजपाई जब दें किसी को ‘भाषा-ज्ञान’
तो समझो उलट गया है आज आसमान pic.twitter.com/RmuE6V3H9I— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 9, 2026
उल्टा चोर कोतवाल को डाँटे, अखिलेश यादव यांची टीका
हिमांता बिस्वा यांच्या भांडणाचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत ‘उल्टा चोर कोतवाल को डाँटे’ अशी प्रतिक्रिया दिली. ”भाजपवाले जेव्हा भाषेवरून कुणाला ज्ञान देतील तेव्हा समजा की आज आभाळच उलटलं आहे”, असेही त्यांनी ट्विट केले आहे.


























































