
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या आगामी 2028 मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. न्यूयॉर्कमधील नॅशनल अॅक्शन नेटवर्कच्या बैठकीदरम्यान त्यांना याबाबत विचारण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या की, कदाचित, मी याबद्दल विचार करत आहे. कमला हॅरिस यांच्या या उत्तरावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. 2028 मध्ये अमेरिकन लोकांसाठी कोण सर्वोत्तम काम करू शकते, या आधारावर आपला निर्णय घेतील, असे कमला हॅरिस यावेळी म्हणाल्या. कमला हॅरिस या जो बायडेन यांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्षा होत्या. 2024 ची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प त्यांचा पराभव केला होता.



























































