
मतदान व निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. हे केवळ कायद्याने दिलेले अधिकार आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे. मतदान करणे व निवडणूक लढवणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मतदानाची व्याख्या मताधिकारापुरती मर्यादित आहे. निवडणूक लढवणे हा अतिरिक्त स्वरूपाचा अधिकार आहे. यासाठी पात्रता, अपात्रता व संस्थात्मक निर्बंध लागू शकतात, असेही खंडपीठाने नमूद केले.

























































