हत्या की आत्महत्या? मुरबाडच्या म्हसा घाटात वृद्ध दांपत्याचे मृतदेह आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरबाड-कर्जत मार्गावरील म्हसा घाटात वृद्ध दांपत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. महादू घरत (75) व कमलाबाई घरत (70) अशी त्यांची नावे असून ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. हे दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमागील गूढ लवकरच उलगडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कल्याण तालुक्यातील भिसोळ या गावात महादू घरत व कमलाबाई घरत हे दाम्पत्य राहात होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तिन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. तर मुलगा बदलापूरमध्ये राहतो. 23 एप्रिलपासून दोघेही बेपत्ता झाले होते.