हे करून पहा – गॅस लायटर असे करा स्वच्छ…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकिंग सोडा आणि टुथब्रशने लायटर हलक्या हाताने स्वच्छ करा. यामुळे चिकटपणा निघण्यास मदत होते. याशिवाय व्हाईट व्हेनेगरदेखील लायटर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरते.

सॅनिटायझरनेदेखील लायटर स्वच्छ करता येते. एका टिश्युपेपरवर थोडे सॅनिटायझर टाकून लायटर हलक्या हाताने पुसून घ्या. याशिवाय लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा वापरूनदेखील लायटर असेच पुसून स्वच्छ करता येते.