असं झालं तर… विमानाला विलंब किंवा रद्द झाल्यास…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

काही वेळा विमान उड्डाणे करण्यास उशीर होतो आणि काही प्रकरणांमध्ये ती रद्ददेखील केले जातात. अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

डीजीसीएच्या नियमानुसार, एखाद्या विमानाला 6 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, प्रवाशांना 24 तास आधी वेळेची माहिती द्यावी लागेल.

प्रवासी थांबायला तयार नसतील तर त्यांना दुसऱया विमानामध्ये पाठवावे किंवा पैसे परत करावेत. ठरावीक वेळेपेक्षा उशीर झाल्यास, प्रवाशांना जेवण आणि अल्पोपाहार द्यावा.

24 तास अगोदर  विमान रद्द झाल्याची माहिती एअरलाइन कंपनीने प्रवाशांना दिली नाही किंवा कनेक्टिंग फ्लाइट चुकली, तर प्रवाशांना भरपाई मिळते.

तुम्ही रोखीने पेमेंट केले असेल, तर एअरलाइन्सला पैसे परत करावे लागतील. क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे बुकिंग असल्यास आठवडाभरात बँक खात्यात जमा केली जाते.