
सोशल मीडियावर अशा जुगाडांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या असाच एक हटके आणि भन्नाट जुगाड इंटरनेटवर व्हायरल होतोय. एका ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शक्कल लढवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, जमिनीत एक मोठा बांबू उभा करण्यात आला आहे. त्या बांबूला एका ठिकाणी छिद्र पाडून त्यामध्ये नळ बसवण्यात आला आहे. एवढंच नाही तर बांबूच्या वरच्या टोकाला मोठी पाण्याची बाटली उलटी बसवण्यात आली आहे. बाटलीतील पाणी थेट बांबूमध्ये साठते आणि नळ उघडताच पाणी बाहेर येते. अगदी कमी खर्चात आणि उपलब्ध साधनसामग्री वापरून तयार केलेली ही पाण्याची व्यवस्था आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील riderÀrince_yadav_br43 या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे.




























































