असं झालं तर… अपघातग्रस्त गाडीचा विमा क्लेम करण्याआधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वाहनाचा अपघात झाला तर सर्वात आधी इन्शुरन्स क्लेम करण्याचे काम केले जाते. सात ते दहा दिवसांत आपला इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी अर्ज केला पाहिजे.

अपघाताची सर्वप्रथम माहिती विमा कंपनीला द्यावी. त्यानंतरच वाहन गॅरेज किंवा डीलरकडे नेले पाहिजे. यासोबत तुम्ही तुमची कार गॅरेजमध्ये जमा केल्याचा गॅरेजकडून पुरावा घ्या.

अपघाताची माहिती विमा कंपनीला द्यावी. त्यानंतरच वाहन गॅरेज किंवा डीलरकडे नेले पाहिजे. कार गॅरेजमध्ये जमा केल्याचा गॅरेजकडून पुरावा घ्या.

गाडीच्या दुरुस्तीसाठी लागलेला खर्च आपल्या क्लेम अर्जावर लिहावा. जर या विम्यात तुमचाही विमा असेल तर त्याचे वैद्यकीय मेडिकल बिलदेखील विमा कंपनीला दिले पाहिजे.

तुम्ही क्लेम केलेल्या रकमेत आणि विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱया रकमेत अंतर असते. तुम्ही विमा कंपनीच्या प्रतिनिधीला क्लेमच्या प्रत्येक बाबीबद्दल प्रश्न विचारा.