
महाराष्ट्रातील युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या युवक आणि युवती पदांकरिता नेमणुका करण्यात येणार आहेत. युवासेना कॉलेज कक्ष निरीक्षक, कार्यकारिणी सदस्य, कॉलेज कक्ष सचिव, लोकसभा समन्वयक आणि विधानसभा समन्वयक आदी पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथे होणार आहेत.
युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे, तसेच येताना आपले छायाचित्र (फोटो) सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी उपलब्ध असतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.





























































