अबब… डंपर गेला दहा फूट भगदाडात; रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांचा दावा फोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गंगापूर रस्त्यावरील नवशा गणपती मंदिराकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्याला शुक्रवारी दहा फूट खोल भगदाड पडले. खडी घेऊन आलेला डंपर यात कोसळला. महापालिकेच्या बेफिकिरीबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रस्ते दुरुस्तीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दावा फोल ठरला आहे. डंपर चालकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांची येथे मोठी गर्दी झाली. या रस्त्यावरील खड्डे खडी-डांबराने बुजवून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. मजबूतीकरणाचे काम वेळीच हाती घेतले असते तर ही घटना घडली नसती, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.