कुर्ला येथे मोमोज खाऊन 16 जणांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला पश्चिम सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यामुळे रविवारी 16 जणांना विषबाधा झाली. सर्वांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी तसेच चक्करचा त्रास झाला. त्यातील 14 जणांना कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दोघांवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी भाभा रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास करून त्यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.