
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी हातभट्टीच्या दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला उरुळी कांचन पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाठलाग करून जेरबंद केले. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या लोंढेने पोलिसांना चकवा देण्यासाठी आपला लूकही बदलला होता. नेहमी दाढी-मिशी आणि कपाळावर टिळा लावून वावरणारा लोंढे दाढी-मिशी काढून मळकट कपड्यांमध्ये वावरत असल्याचे तपासात समोर आले आहे.
दापोडी आणि हडपसर परिसरात २६ ते २८ मे दरम्यान विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू असून, आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

























































