
१ सप्टेंबर २०२६ पासून गॅस सिलिंडरपासून ते एटीएम चार्जेसपर्यंत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. तेल कंपन्या १ तारखेपासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. या किमती स्वस्त किंवा महाग होऊ शकतात. ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला १९ किलोचा कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलिंडर २०२ रुपयांनी स्वस्त झाला होता, तर १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्या होत्या.
१ सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन काउंटरवर रांगा लावण्याची गरज भासणार नाही, कारण बोर्डिंग पासवर स्टॅम्प लावण्याची गरज उरणार नाही. प्रवाशांना मोबाईलमध्ये ई-बोर्डिंग पास किंवा त्याची हार्ड कॉपी दाखवून इमिग्रेशन करता येईल.
एलपीजी कनेक्शनचे ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत; यासाठी अखेरची मुदत (डेडलाईन) ३१ ऑगस्ट आहे. तेल मार्केटिंग कंपन्या नेहमी हवाई इंधन म्हणजेच ‘एअर टर्बाइन फ्युएल’च्या किमतीत बदल करू शकतात, ज्याचा थेट परिणाम हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होईल. सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल होऊ शकतात.
१ तारखेपासून एटीएम ट्रान्झॅक्शनचे शुल्क बदलू शकते. एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास बँक ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करू शकते.
निखिल प्रॉडक्ट्सच्या तीन अगरबत्त्या बाजारात दाखल
निखिल प्रॉडक्ट्स बंगलोर अगरबत्तीने ‘संगीत सागर’, ‘कल्पवृक्ष’ आणि ‘सिग्नेचर ऊद अगरबत्ती’ या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या बाजारात आणल्या आहेत. संगीत सागर आणि कल्पवृक्ष अगरबत्ती नैसर्गिक सुगंधी द्रव्ये आणि हलमडीपासून तयार केलेली आहे. सिग्नेचर ऊद अगरबत्ती उच्च दर्जाच्या आसामच्या ऊद तेलापासून तयार करण्यात आली आहे. या तिन्ही अगरबत्त्या ५० ग्रॅम पॅकमध्ये उपलब्ध आहेत. या अगरबत्त्या मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. संपर्क: मुंबई – 8655766778, 9769078365, 7506816272 | ठाणे – 9167658768 | वाशी – 8879374592
एमजीच्या दोन नव्या कार बाजारात
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने ‘एमजी हेक्टर टॉमहॉक’ आणि ‘प्लग्ड-इन हायब्रिड कार’ बाजारात आणली आहे. यातील हायब्रिड कारची रेंज पूर्ण इंधन भरल्यानंतर ११०० किमीपर्यंत आहे. हेक्टर टॉमहॉकची किंमत १३.९९ लाख रुपये, तर प्लग्ड-इन हायब्रिडची किंमत २७.७९ लाख रुपये आहे. कंपनीने टॉमहॉक ईव्ही ५-सीटर आणि ७-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केली आहे. एमजी हेक्टर टॉमहॉक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. या एसयूव्हीमध्ये एलइडी हेडलॅम्प्स, एलइडी टेललॅम्प्ससह १७-इंचाचे अलॉय व्हील्स आहेत.
इंडियाफर्स्ट लाईफमध्ये सेल्सफोर्सचे एजंटफोर्स
‘सेल्सफोर्स’ या एजंटिक सीआरएम (CRM) कंपनीने आज जाहीर केले की, बँक ऑफ बडोदाची उपकंपनी असलेल्या इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या संपूर्ण व्यवसायातील एआय परिवर्तनाला गती देण्यासाठी सेल्सफोर्सच्या ‘एजंटफोर्स’ची (Agentforce) निवड केली आहे. इंडियाफर्स्ट लाईफ महत्त्वाच्या कामांमध्ये विश्वासार्ह एआय एजंट्सचा वापर करणार आहे. इंडियाफर्स्ट लाईफ सध्या ९० पेक्षा जास्त शहरांतील ग्राहकांना सेवा देत आहे.
ओपनएआयची एआय मॉडेल्स भारतात उपलब्ध
ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने (AWS) भारतात ॲमेझॉन बेडरॉकवर ओपनएआयच्या ‘जीपीटी-५.६ टेरा’ आणि ‘ल्युना’ या मॉडेल्सची इन-कंट्री इन्फरन्सिंग सुविधेसह घोषणा केली. या सुविधेमुळे ॲमेझॉन बेडरॉकवरील ओपनएआय मॉडेल्सची प्रक्रिया एडब्ल्यूएसच्या पायाभूत सुविधांवर भारतातच केली जाईल. त्यामुळे संस्थांना अत्याधुनिक मॉडेल्सचा स्थानिक पातळीवर लाभ घेता येणार आहे.
मनीष दलाल एनईएनच्या अध्यक्षपदी
नॅशनल आंत्रप्रन्योरशिप नेटवर्क (NEN) ने मनीष दलाल यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मनीष यांच्याकडे अमेरिका आणि ॲपॅकमधील (APAC) एआय, सास (SaaS) आणि क्लाउड व्यवसायांमध्ये सामान्य व्यवस्थापन, व्यवसाय विकास आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. मोटोरोला, याहू, व्हिसिसिग्न (Verisign), एंड्युरन्स आणि नेक्स्टिव्हा यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
‘सिग्नेचर सिरीज’ लाँच
शिवानिका फूड प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत ‘क्लॉ स्नॅक्स’ची (Claw Snacks) सिग्नेचर सिरीज लाँच केली आहे. ‘क्लॉ’ हा आधुनिक आणि आरोग्याबाबत जागरूक असणारा स्नॅकिंग ब्रँड असून, चवीसोबत अधिक चांगले आरोग्यदायी पर्याय देण्यावर त्याचा भर आहे.
प्रेस्टिजचे फ्लेक्सी ग्रिल लाँच
कूकवेअर ब्रँडने ऑल-न्यू ‘प्रेस्टिज फ्लेक्सी ग्रिल जम्बो १८०’ लाँच केले आहे. हे एक बहुउपयोगी इलेक्ट्रिक ग्रिल आहे. फ्लेक्सी ग्रिल जम्बो १८० मध्ये नावीन्यपूर्ण १८०-डिग्री ओपनिंग मेकॅनिझम दिलेले आहे. प्रेस्टिज फ्लेक्सी ग्रिलची किंमत ४,२७५ रुपये आहे.
सिग्माचा मोठा करार
सिग्मा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्सने रोल्स-रॉयस एरोस्पेस (UK) सोबत अंदाजे १२५ दशलक्ष डॉलर मूल्याचा अतिरिक्त दीर्घकालीन करार केला आहे. हा करार रोल्स-रॉयससोबतच्या नुकत्याच संपादित केलेल्या ३०० दशलक्ष डॉलर मूल्याच्या दीर्घकालीन कराराला पूरक आहे.
महिंद्राचा नवीन ट्रक लाँच
वाहन उद्योगात देशात अग्रेसर असलेल्या ‘महिंद्रा ट्रक अँड बस’ कंपनीने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेला ‘ब्लेजो आय-टीआरके’ (Blazo i-TRK) हा ट्रक लाँच केला. हा लाँचिंग सोहळा वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडला. या प्रसंगी वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































