राज्यात आज पाऊस परतणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस उद्या, रविवारी पुन्हा जोरदार बरसणार आहे. विशेषतः कोकणासह घाटमाथ्यावर पाऊस होईल; तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. ३० ऑगस्टला मुंबई, पालघर, ठाण्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस होईल; तर कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड व धाराशिवमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.