दिंडोशीच्या दहीहंडीत जागृत तरुणाईला सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य - रुपेश जाधव

मानाची हंडी म्हणून ओळख असलेली दिंडोशीची दहीहंडी यंदाही उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. शिवसेना दिंडोशी विधानसभा व कल्पतरू युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली यंदाची हंडी देशातील जागृत तरुणाईला समर्पित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत मालाड पूर्वेतील कुरार गाव, स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे हा दहीहंडीचा मनोरंजक सोहळा पाहता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू व युवासेना कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक अंकित प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला हा दहीकाला उत्सव शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. या उत्सवाला शिवसेना उपनेते, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विभाग संघटक शालिनी सावंत, विधानसभा संघटक प्रशांत कदम, रिना सुर्वे, पूजा चौहान, विधानसभा समन्वयक आशा केणी, सुनील गुजर, प्रदीप निकम, काशिनाथ परब, गणपत वारीसे, रुचिता आरोसकर, वृंदा पाळेकर, विद्या गावडे, सानिका शिरगांवकर आदी उपस्थित राहणार आहेत.