असं झालं तर… मोबाईल चोरीला गेला तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्यास गोंधळून जाऊ नका. सरकारने मोबाईल चोरांना कायमचा धडा शिकवण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा सुरू केली आहे.

सर्वप्रथम तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधून चोरीला गेलेले सिम कार्ड ब्लॉक करा. त्यानंतर त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड मिळवून घ्या.

ऑनलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मोबाईल चोरीची तक्रार नोंदवा. तक्रारीची एफआयआर (FIR) प्रत आणि ‘तक्रार क्रमांक’ सुरक्षित ठेवा.

संगणक किंवा दुसऱ्या फोनवर http://www.ceir.gov.in ही वेबसाईट उघडा. तिथे ‘Block Stolen/Lost Mobile’ या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण माहिती भरा.

तक्रार सबमिट होताच २४ तासांत तो मोबाईल दूरसंचार नेटवर्कवरून ब्लॉक केला जातो. त्यामुळे चोरट्याने त्यात नवीन सिम कार्ड टाकले, तरीही ‘नो सर्व्हिस’ (No Service) असेच दाखवेल.