तामिळनाडूत भरधाव कारची ट्रकला धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमधील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर शुक्रवारी मध्यरात्री दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील ८ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेले सर्व विद्यार्थी तामिळनाडूचे रहिवासी होते. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील महामार्गावर हा अपघात घडला. अपघाताचे भयानक दृश्य महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

तामिळनाडू पासिंगची ही कार गुरुवायूरकडून कोडुंगलूरच्या दिशेने वेगाने जात होती. राष्ट्रीय महामार्ग ६६ वर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. याच डायव्हर्शनजवळ एक ट्रक उभा होता. कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर परिसरात धुराचे आणि धुळीचे लोट पसरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले सर्व तरुण तामिळनाडूतील दिंडीगुल येथील पीएसएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते.