असं झालं तर… कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप स्लो चालतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वेग वाढवण्यासाठी सिस्टम रिस्टार्ट करणे, अनावश्यक ऍप्स बंद करणे आणि स्टोरेज मोकळे ठेवणे या सोप्या टिप्स प्रभावी ठरतात.

सिस्टम खूप वेळ चालू ठेवल्यास बॅकग्राऊंडमध्ये अनेक तात्पुरत्या फाइल्स साचतात, सिस्टम पूर्णपणे शटडाऊन केल्यास वेग पुन्हा पूर्ववत होतो.

कॉम्प्युटर सुरू होताच आपोआप चालू होणाऱया सॉफ्टवेअर्समुळे सिस्टमवर ताण येतो. त्यामुळे अनावश्यक प्रोग्रॅम्स/ऍप्स बंद किंवा डिसेबल करा.

वापरात नसलेले प्रोग्रॅम्स अनावश्यक फाइल्स अनइन्स्टॉल करा आणि डिस्क क्लीनअपद्वारे टेम्पररी फाइल्स डिलीट करून स्टोरेज मोकळे करा.

ऍण्टीव्हायरस स्कॅन करा आणि विंडोज किंवा सिस्टम अपडेट्स वेळेवर पूर्ण करा. तसेच हार्डवेअर अपग्रेड केल्यास सिस्टम वेगाने काम करू लागेल.