
अमेरिका आणि चीनसारख्या मोठय़ा बाजारपेठांमध्ये मद्य प्राशनात घट झाली असताना हिंदुस्थानात 2026 च्या पहिल्या सहामाहीत तब्बल 10 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. जगातील 21 प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वाधिक वाढ हिंदुस्थानात झाली आहे.
आयडब्ल्यूएसआर या मद्य विक्री आणि प्राशनाचा अभ्यास करणाऱया संशोधन संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून 2026 या कालावधीत भारतातील मद्य प्राशनात लक्षणीय वाढ झाली. यामध्ये बीअरच्या प्राशनात सर्वाधिक 16 टक्के वाढ नोंदविण्यात आली.
रणांगणावरून पळ, 66 सैनिकांना फाशी
आफ्रिकन देश असलेल्या काँगोमध्ये रणांगणावरून पळ काढल्याबद्दल आणि आदेशांचे पालन न केल्याबद्दल 66 सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उत्तर किवू प्रांतातील वालिकेल येथे एकूण 71 सैनिकांवर लष्करी न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. यापैकी 66 जणांना फाशी, एकाला 10 वर्षांचा तुरुंगवास, तर उर्वरित चार सैनिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी विद्रोही संघटना एफआरएन यांच्यासोबत झालेल्या चकमकीदरम्यान हे सैनिक आपली पोस्ट सोडून पळून गेले होते.
हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा दुबईत मृत्यू
दुबईत गाडीचे टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला मदतीसाठी थांबलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. नायफा बल्कीस हमीद (21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. नायफा ही पॅनेडियन युनिव्हर्सिटी दुबईमध्ये आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. गाडीचे टायर पंक्चर झाल्यामुळे मदतीची प्रतीक्षा करत असताना एका भरधाव वाहनाच्या धडकेत ठार झाली. अपघाताच्या काही क्षण आधी, विद्यापीठाकडे जात असताना गाडीचे टायर पंक्चर झाल्याबद्दल नायफा वडिलांशी पह्नवर बोलत होती.

























































