
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या पार्श्वभूमीवर शासकीय मालकीच्या विमानांच्या महत्त्वाच्या कामांसाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सहा कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
राज्य शासनाच्या मालकीचे सेसना सायटेशन 560 एक्सएलएस व्हीटी सायटेशन हे विमान आणि एअरबस एच 145 व्हीटी जीओव्ही हे हेलिका@प्टर आहे. शासनाचे विमान व हेलिकॉप्टरच्या विमान चालन व्यवस्थापन सेवेसाठी नवी दिल्लीतील अॅरो एअरक्राफ्ट सेल्स अॅण्ड चार्टर्ड प्रा. लि. या पंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या विमानांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांचा संभाव्य खर्च भागवण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विमानाची यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीच्या कामांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये सहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्यातील तीन कोटी रुपये यंत्रसामुग्री व तीन कोटी रुपये साधनसामुग्रीसाठी होते. अशा प्रकारे सहा कोटी रुपयांचा हा निधी वितरीत करून खर्च करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. हा निधी शासकीय विमानांच्याच कामांसाठी वापरण्याची अट घालण्यात आली असून खर्चाचा तपशील राज्य सरकारला आणि महालेखापाल कार्यालयास मुदतीत सादर करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत.


























































