
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. तर एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी आहे. कुलगाममधील दोन गावात वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईत चकमकीत दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच एका जवानाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी जवानावर उपचार सुरू आहेत.
#WATCH | Kulgam, Jammu and Kashmir: Encounter started at Modergam Village of Kulgam District. Police and Security Forces are on the job: Kashmir Zone Police
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/1MC0d2xJhi
— ANI (@ANI) July 6, 2024
गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला असून कारवाई सुरू आहे. बातमी देईपर्यंत सुरक्षा दलाचे जवान आणि दहशदवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. या मोहीमेत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.