Aaditya Thackeray News – तर मुंबईकर पालिकेच्या दारात येतील, आदित्य ठाकरे यांनी दिला इशारा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना दुषित पाणी मिळत आहे. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिकेला जाब विचारला आहे. मुंबईकरांना दुषित पाणी मिळत आहे, काही ठिकाणी पाणी मिळत नाही, यावरून पालिकेने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

एक्सवर आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करून म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना दुषित आणि गढूळ पाणी मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. काही भागातल्या नागरिकांनी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे पहिल्यांदाच एवढ्या पाण्यासंदर्भात तक्रारी आल्या असती, आणि प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे मुंबईकरांना कमी पाणी मिळत होतं. आता अनेक इमारतींना कमी पाणी मिळतंय.या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने पत्रकार परिषद घ्यावी. मुंबईकरांना दुषित आणि कमी पाणी का मिळतं यावर स्पष्टीकरण द्यावं. नाहीतर मुंबईर पालिकेच्या दारात येतील आणि पालिकेला प्रश्न विचारतील असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

जर मुंबई महानगरपालिकेच्या पालिका आयक्तांनीच ही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले तर उत्तमच असेही आदित्य ठाकरे म्हणाले.