लाडक्या कंत्राटदारासाठी मिंधे सरकार महिला अधिकाऱ्यांचा राजीनामा घेत आहे, म्हणजे त्यांना महाराष्ट्र लुटायला सोपं जाईल असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच ही बाबा लाजिरवाणी आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांबद्दल असलेल्या दयनीय मानसिकेतबद्दल भाष्य केलं. राज्याच्या पहिल्या महिला सचिव सुजाता सौनिकजी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच भाजप आणि मिँधे सरकार त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडत आहेत अशी माहिती आहे. त्यांनी राजीनामा दिला की त्यांच्या जागी भाजप आणि मिंधेंचा माणूस या पदावर येईल आणि त्यांना महाराष्ट्र लुटायला मदत करेल.
ही लाजिरवाणी बाब असून सुजाता यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नसताता राजीनामा का द्याावा. हे सारं कशासाठी तर सौनिक यांनी राजीनामा दिल्यावर बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि भाजप आपल्या लाडक्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी?
हेच ते मिंधे-भाजप सरकार जे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांकडून मत मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण यांच्यात मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांवर महिलांविरोधात गुन्हे दाखल आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Just as the @rashtrapatibhvn President of India, Murmu ji, speaks about countering the mindset that sees women as “less powerful, less capable…”
reports state that the bjp- mindhe govt in Maharashtra is working on making Chief Secretary, Sujata Saunik ji, resign even before her… pic.twitter.com/ooHuRnkCIp
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 29, 2024