युद्धामुळे दैनंदिन जीवनावर कोणता परिणाम होणार ते सरकारने अधिकृतरित्या सांगावं- आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण व इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी मागच्या चार वर्षांतील उच्चांक गाठला आहे. बॅरलमागे 72 डॉलरवरून 110 डॉलरवर उसळी घेतली आहे. युद्धामुळे राज्यात गॅस सिलिंडरचा देखील तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. गॅस पुरवठा होत नसल्याने मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या सगळ्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या जीवनावर पडत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारने याबाबत अधिकृत माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा आपल्या देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होणार आहे. या युद्धामुळे सामान्य जनतेला कोणत्या परिणामांना, त्रासाला सामोरे जावे लागणार आहे याची केंद्र सरकारने संपूर्ण देशाला अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केली आहे.