मंगळवारी देशातील हरयाणा व जम्मू कश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले. 2019 ला महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणूक एकत्र झाली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यांसोबत महाराष्ट्राची निवडणूक देखील होईल अशी अपेक्षा होती. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र अद्याप निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीची घोषणा केलेली नाही. त्यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेल यांनी मिंधे भाजप सरकार व निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ” निवडणूक आयोग मिंधे भाजप सरकार पूर्णपणे राज्याला लुटण्याची वाट पाहत आहे’,अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे.
Basically the Election Commission is waiting for the Shinde- bjp regime to loot the state entirely. Every penny that they possible can. https://t.co/sMgvfaZQil
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 9, 2024