
मुंबईत वरळीमधील आर्थर रोड नाका येथील शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी आणि बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिका आणि बिल्डरला इशारा दिला आहे. मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे.
आर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या, शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी व बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे.
आज ह्या मंदिर परिसराची पाहणी करून, लक्ष्मीनारायण मंदिर समितीच्या सदस्यांसोबत संवाद साधला.येथील रहिवाशांचे… pic.twitter.com/fvTxllDRH8
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 21, 2025
आर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी आणि बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे. आज या मंदिर परिसराची पाहणी करून लक्ष्मीनारायण मंदिर समितीच्या सदस्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला.
मुंबईतील 69 टक्के शौचालयांत ना पाणी ना वीज! प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे येथील रहिवाशांचे श्रद्धास्थान आहे. इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरत नसतानाही मंदिर समितीला नोटीस का देण्यात आली? मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी सहन करणार नाही. मंदिराची जागा वाचवण्यासाठी आम्ही समितीच्या सदैव सोबत आहोत, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
कोरोना पसरतोय, केंद्राचाही अलर्ट, केरळात सर्वाधिक लागण… मुंबईत आढळले 56 रुग्ण
मंदिराला जर कोणी हात लावला तर या बिल्डरला विक्रीच्या सदनिकांची इमारत बांधू देणार नाही. पण प्रश्न हा आहे, दुसऱ्यांना हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणाऱ्या भाजपच्या राज्यात एवढ्या मंदिरांना नोटीस का जातात? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी महायुती सरकारला घेरले.