बॉलिवूड अभिनेता आमीर खान त्याच्या उत्तम अभिनयासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यसाठी नेहमी चर्चेत असतो. नेहमीच त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. आमिर खानची दोन लग्ने झाली असून घटस्फोटही झाले आहेत.
दरम्यान रिना आणि किरण यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर आता चर्चा सुरू आहे ती आमिरच्या तिसऱ्या लग्नाची. मात्र आता आमिरने या चर्चांवर मौन सोडले आहे.
आमिरचे पहिले लग्न 1986 मध्ये रिना दत्तासोबत झाले होते. या दोघांना आयरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत. रिनानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. रिनानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर आणि किरणच्या घटस्फोटाची माहिती आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तेव्हापासून नेटकरी आमिरच्या तिसऱ्या लग्नाबाबत विचारत होते.
नुकताच आमिर रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर गेला होता. रियाने त्याला त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत प्रश्न केला. यावेळी मात्र त्याने मौन सोडले. ‘मी आता 59 वर्षांचा आहे. मला वाटत नाही की मी आता पुन्हा लग्न करू शकेन. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा जोडलो आहे. मला मुले, भाऊ आणि बहिणी आहेत. माझ्या जवळच्या लोकांमध्ये मी आनंदी आहे. मी एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे मला वाटत नाही मी पुन्हा एकदा लग्न करेन’, असे यावेळी आमिरने स्पष्ट केले आहे.