दिल्ली मार्शल्सला नियुक्त करावे अशी मागणी आप सरकारने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री आतिशी यांनी एक नोटही पास केली आहे. मार्शल्सची नियुक्ती करण्यासाठी आप काहीही करू शकतं असं म्हणत मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजप आमदाराचे पाय धरले आहेत. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मार्शल्सच्या नियुक्तीसाठी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मार्शल्सची नियुक्ती केली जावी असा ठराव पार पडला. मंत्रिमंडळातून हा ठराव नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे जाणार होता. सर्व मंत्री आणि आमदार हा ठराव नायब राज्यपालांकडे द्यायला निघाले. पण भाजप आमदार यासाठी तयार नव्हते. त्यामुळे आपचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी या भाजप आमदाराचे पाय धरले.
आपने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तसेच मार्शलच्या नियुक्तीसाठी आप काहीही करू शकते असे पोस्ट मध्ये म्हटले आहे. तसेच एवढ्या संघर्षानंतर भाजप आमदाराला नायब राज्यपालांच्या निवासस्थानी नेण्यात आल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
बस मार्शलों की बहाली के लिए किसी भी हद तक जाएगी AAP 🙏💯
बस मार्शलों की बहाली के लिए जब LG House जानें से बचकर भाग रहे थे भाजपा के विधायक तो मंत्री @Saurabh_MLAgk जी ने पकड़ लिए उनके पैर।
कठिन संघर्ष के बाद आखिर भाजपा के विधायकों को LG House ले जाया जा सका। pic.twitter.com/IW2uHWig2y
— AAP (@AamAadmiParty) October 5, 2024