‘आप’च्या राज्यसभा खासदारांचा शपथविधी

आम आदमी पार्टी च्या पंजाबातून राज्यसभेवर वर्णी लागलेल्या तीन खासदारांचा आज सदस्यत्वाचा शपथविधी झाला. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत राघव चड्डा, अशोककुमार मित्तल आणि संजीव अरोडा यांनी आज राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य या नात्याने पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यसभा महासचिव पी सी मोदी यांनी खासदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. सचिवालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपसभापती हरिवंश सिंग, संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन उपस्थित होते.