
आम आदमी पार्टीने राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांची अचानक पक्षाच्या उपनेतेपदावरुन उचलबांगडी केली. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली आहे. राज्यसभा सचिवालयाला यासंदर्भात पक्षाने पत्र लिहून माहिती दिली. सभागृहात चढ्ढा यांना पक्षाच्या वतीने बोलण्याची परवानगी देऊ नये, असे या पत्रात म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे, मात्र तो ‘आप’ने फेटाळला.



























































