आशीष शेलार यांचा स्पेन दौरा रद्द

राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी स्पेनचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनमधील बार्सिलोनामध्ये आयटी सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस आणि बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस 2025 ही परिषद 13 ते 15 मे या काळात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राज्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार उपस्थित राहाणार होते. त्यांच्यासोबत खात्याचे सचिव पराग जैन नैनुतियाही परिषदेला उपस्थित राहाणार होते. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आशीष शेलार यांनी स्पेन दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.