कोल्हापुरात भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकींना उडवले; तीन तरुण ठार, कारचालकाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुण्यात पोर्शे कारच्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात आज थरकाप उडवणारा अपघात घडला. सतत वाहनांची वर्दळ असलेल्या शिवाजी विद्यापीठ परिसरातील सायबर चौकात भरधाव कारने दुचाकींना उडवले. यात तीन तरुण ठार झाले. दरम्यान, कारचालकाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

हर्षद सचिन पाटील (16), प्रथमेश सचिन पाटील (24), अनिकेत चौगुले  असे या  अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातात चारजण जखमी झाले आहेत.

 माजी प्र-कुलगुरू कार चालवत होते; ब्रेक ऐवजी ऑक्सिलेटरवर पाय पडला

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. व्ही. एम. चव्हाण हे कार चालवत होते. सायबर चौकातून जात असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले. त्यांचा पाय ब्रेकऐवजी ऑक्सिलेटरवर पडला. त्यामुळे  अपघात घडला. त्यात त्यांचाही मृत्यू झाला.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या अपघाताची दाहकता पाहून कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला.