तुरुंगात अभिनेता दर्शनला मिळतायत सर्व सोयीसुविधा, व्हायरल फोटोतून धक्कादायक माहिती आली समोर

हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर दर्शनचा एक फोटो व्हायरल होत असून त्यात तो तुरुंगातील इतर तीन साथिदारांसोबत खुर्च्यांवर बसून आरामात चहा पित आहे. तसेच त्याच्या हातात सिगारेट देखील आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या व्हायरल फोटोत दर्शन एका मोकळ्या जागेत खुर्ची वर बसलेला दिसत आहे. ही जागा तुरुंगातील आहे की तुरुंगाबाहेरची यावरही प्रश्न उपस्थित होत आहे.