स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून चुपून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा गंभीर जखमी झाले आहेत. परवाना असलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना ही घटना घडली.
गोविंदा हे आज पहाटे विमानाने कोलकाता येथे जाणार होते. कोलकाताला जाण्यापूर्वी ते कपाटातील सुटकेसमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवत होते. तेव्हा अचानक रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि त्यातून चुकून गोळी सुटली. ती गोळी गोविंदा याच्या पायाला लागली. घटना घडली तेव्हा संरक्षण शाखेचा पोलीस तेथे होता.
– तातडीने गोविंदा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे युनिट 9 चे दया नायक व पथक रुग्णालयात पोहचले. घटना घडली तेव्हा गोविंदा हे एकटेच घरी होते. घटना घडली ती खोली बंद करण्यात आली असून जुहू पोलीस पंचनामा करणार आहेत.