तामीळ सुपरस्टार विशाल स्टेजवर बेशुद्ध

तामीळ सुपरस्टार विशाल कृष्णा रेड्डी अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. विशाल अचानक स्टेजवर बेशुद्ध पडल्याने एकच खळबळ उडाली. त्याला त्वरित स्टेजवरून खाली उतरवण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. विशालच्या टीमने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. विशालने त्या दुपारी जेवण केले नव्हते. तो फक्त ज्यूस प्यायला. त्यामुळे त्याची ऊर्जा कमी झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. सुदैवाने काळजी करण्यासारखे काही नाही. तो विश्रांती घेत आहे आणि बरा होत आहे, असे त्याच्या टीमने स्पष्ट केलेय. विशाल हे तामीळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने ‘सत्यम’, ‘वेदी’, ‘अंबाला’, ‘अॅक्शन’, ‘चक्र’, ‘खलनायक’, ‘रत्नम’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.