
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता ही प्रचंड गाजलेली भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लग्नबंधनात अडकली आहे.

अपूर्वाने 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी तनुज गोवळकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

अपूर्वाने स्वत: सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

लग्नात अपूर्वाने गर्द हिरव्या रंगाचा शालू नेसला असून तनुजने सफेद रंगाचा कुर्ता व हिरव्या रंगाचे धोतर नेसले होते. अपूर्वाने लग्नात अगदी मराठमोळा साज शृंगार केला होता.

























































