रवीना टंडनची मागणी; आंदोलक शेतकऱयांना तुरुंगात डांबा

सामना ऑनलाईन, मुंबई

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात आंदोलन करणाऱया शेतकऱयांना तुरुंगात डांबा, त्यांना जामीनही देऊ नका, अशी मागणी अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केली आहे. आंदोलनात शेतकरी कृषीमाल आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. त्यामुळे आंदोलनकारी शेतकऱयांना अटक करा, त्यांना जामीनही देऊ नका, असेही रवीनाने म्हटले आहे. रवीनाच्या या ट्विटरवर नेटकऱयांनी टीका केली आहे. पण तिने आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तिने आपले ट्विट कायम ठेवले आहे.