
गेल्या वर्षी अभिनेत्री उर्मिला कोठारेचा कार अपघात झाला होता. याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. त्यावर संशय व्यक्त करत हा तपास सीआयडी अथवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी करणारी फौजदारी याचिका अभिनेत्री उर्मिला कोठारेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली. या अपघाताचा तपास करणाऱया समता नगर पोलिसांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.
अपघात झालेल्या कारचा तपासणी अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने आरटीओला द्यावेत, अशीदेखील मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावरील पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार आहे.
पोलीस सीसीटीव्ही देत नाहीत
हा अपघात नेमका कसा झाला, हे पोलिसांनी शोधायला हवे. अपघाताच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली. तेथे सीसीटीव्ही नसल्याचे पोलीस सांगत आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
पंचनामा केला नाही
अपघाताच्या ठिकाणी मेट्रोचे काम करणाऱया पंत्राटदार पंपनीने जेसीबी व अन्य बांधकामाचे साहित्य रस्त्यात ठेवले होते. बॅरिकेडस् लावले होते. नंतर हे बांधकाम साहित्य तेथून काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला नाही. पोलीस पंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
अपघाताच्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू होते. सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. वाहनांना दिशा दाखवली जात नव्हती, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.


























































