छत्तीसगडमध्ये भूसुरुंग स्फोटात पोलीस अधिकारी शहीद, अनेक अधिकारी आणि पोलीस जखमी; नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम तीव्र

छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे (46) शहीद झाले. तर इतर काही अधिकारी आणि पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. गिरीपुंजे हे सुकमा जिह्याच्या कोटा विभागात कार्यरत होते. या घटनेनंतर नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या आक्रमक कारवाईदरम्यान 21 मे रोजी नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता व भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) महासचिव नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू याचा सुरक्षा जवानांनी चकमकीत खात्मा केला होता. या चकमकीत एकूण 27 नक्षलवादी ठार झाले होते. बसवा राजूच्या स्मरणार्थ व सरकारच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या पेंद्रीय समितीचा सदस्य भूपती ऊर्फ अभय याने 10 जून रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सुकमा जिह्यात 9 जून रोजी सकाळी नक्षलवादविरोधी अभियान राबविण्यात येत होते. या मोहिमेत काsंटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे स्वतः जवानांसोबत पायदळ गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. काsंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ नक्षलवाद्यांनी आयईडी स्पह्टके पेरून ठेवली होती. गिरीपुंजे त्या ठिकाणी पोहोचताच नक्षलवाद्यांनी स्पह्ट घडवून आणला.