
‘कौन बनेगा करोडपती’च्या 17 व्या सीझनला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. या सीझनच्या 8 व्या एपिसोडमध्ये आदित्य कुमार यांनी 1 कोटी रुपये जिंकले आहेत. आदित्य कुमार हे मूळचे उत्तराखंडचे असून ते सध्या सीआयएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. आदित्य यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेची तयारी सुरू केली होती. आदित्य यांनी 2017 मध्ये बिट्स पिलानीच्या हैदराबाद कॅम्पसमधून पदवी प्राप्त केली आहे. सीएपीएफची परीक्षा देऊन ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात असिस्टंट कमांडंट बनले. ते सध्या उकाई थर्मल पॉवर स्टेशन म्हणजेच यूटीपीएसमध्ये डेप्युटी कमांडंट म्हणून तैनात आहेत.